शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा

By admin | Updated: January 4, 2017 02:22 IST

आयकर (तपास) पुणे विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा दिला.

भविष्य कठीण : राकेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केली शासनाची भूमिका
नागपूर : आयकर (तपास) पुणे विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा दिला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत बेहिशेबी रक्कम घोषित करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊन पैसा सन्मानाने वापरण्यास पात्र व्हा. अन्यथा काळ्या पैशांचा लोभ करणाऱ्यांना भविष्यात कुणीही तारू शकणार नाही, असे त्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.
राकेशकुमार गुप्ता हे केंद्र शासनाचा काळ्या पैशांविरुद्धचा लढा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर मार्गदर्शन करण्यासाठी येथे आले होते. रामदासपेठेतील एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या एका निर्णयामुळे कसे होत्याचे नव्हते झाले याकडे त्यांनी सुरुवातीला लक्ष वेधले. केंद्र शासनाला काळा पैसा समूळ नष्ट करायचा आहे. त्यासाठी केंद्र शासन सुरुवातीपासूनच अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. शासनाच्या संबंधित निर्णयानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा एका क्षणात साधा कागद झाल्यात. अनेक करोडपती तत्काळ रोडपती झालेत. काळा पैसा पांढरा करण्याच्या पळवाटा बंद करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णयांत बदल केले. त्यावरून सर्वांनी बोध घेणे आवश्यक आहे असे गुप्ता यांनी सांगितले.पैसा बँकेत जमा केल्यामुळे पांढरा व जवळ बाळगल्यामुळे काळा होत नाही. पैशाचा स्रोत स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात कुणालाही काळा पैसा वापरता येणार नाही.
आयकर विभाग आधुनिक तंत्रज्ञान वापरून अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण करीत आहे. विविध स्रोतांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन साठवलेली रक्कम घोषित करा. यामुळे नियमानुसार काही रक्कम सन्मानाने वापरण्यासाठी मिळेल.
आयकर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास संपूर्ण अघोषित रक्कम हातातून जाईल व त्यावर ७ टक्के अधिकची रक्कमही द्यावी लागेल. याशिवाय अन्य कायदेशीर निर्बंध येतील ते वेगळेच असे गुप्ता यांनी सांगितले.(प्रतिनिधी)