हिंगणा अंबाझरी जंगलात दुसऱ्या दिवशी पुन्हा वनवा
By मंगेश व्यवहारे | Updated: March 13, 2024 14:38 IST2024-03-13T14:37:54+5:302024-03-13T14:38:25+5:30
अग्निशमनचे पथक घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना आगीचे लोट वाहताना दिसले.

हिंगणा अंबाझरी जंगलात दुसऱ्या दिवशी पुन्हा वनवा
नागपूर : हिंगणा अंबाझरी वनपरिक्षेत्रातील बायोडायव्हर्सिटी पार्क परिसरातील जंगलाला मंगळवारी दुपारी आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाकडून सायंकाळपर्यंत आग विझविण्यात आली. या आगीत १० ते १५ एकर जंगल खाक झाले होते.
बुधवारी परत याच भागात आग लागल्याची सूचना अग्निशमन विभागाला सकाळी १०.४६ वाजता आहे. मंगळवारी लागलेल्या आगीत वनसंपदेचे नुकसान झाल्याने अग्निशमन विभागाने तत्काळ एमआयडीसी व वाडी अग्निशमन विभागाला सूचना देऊन लगेच दोन आगीचे बंब घटनास्थळी पाठविले. तर शहरातून चार आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमनचे पथक घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना आगीचे लोट वाहताना दिसले. आग विझविण्याचा प्रयत्न पथकाकडून केल्या जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी दिली.