‘त्या’ सदोष पोलिओ लसीसंदर्भात आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:04 IST2018-10-04T00:03:19+5:302018-10-04T00:04:55+5:30

त्या सदोष पोलिओ लसीसंदर्भात गुरुवारी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे. परंतु त्या बॅचमधील लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झालेला नाही, असे केंद्र्र शासनाच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. होल्डर यांनी स्पष्ट केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तेव्हा राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी बुधवारी केले. विदर्भात १५ लाख बालकांना सदोष पोलिओ लस देण्यात आल्याची बाब लोकमतने सर्वप्रथम उघडकीस आणली. यावर आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.

A high-level meeting in Delhi today regarding 'those' defective polio vaccines | ‘त्या’ सदोष पोलिओ लसीसंदर्भात आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

‘त्या’ सदोष पोलिओ लसीसंदर्भात आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

ठळक मुद्देआरोग्यमंत्री दीपक सावंत : महाराष्ट्रात पुरवठा झाला नसल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्या सदोष पोलिओ लसीसंदर्भात गुरुवारी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे. परंतु त्या बॅचमधील लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झालेला नाही, असे केंद्र्र शासनाच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. होल्डर यांनी स्पष्ट केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तेव्हा राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी बुधवारी केले.
विदर्भात १५ लाख बालकांना सदोष पोलिओ लस देण्यात आल्याची बाब लोकमतने सर्वप्रथम उघडकीस आणली. यावर आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.
टाईप टू पोलिओ विषाणू आढळल्यानंतर केंद्र शासनाच्या चमूने तपासणी केलेली असून, त्यात एका कंपनीने तयार केलेल्या कुपींमध्ये टाईप दोन प्रकारची लस आढळून आली. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीचा वापर थांबविण्याचा निर्णय १० सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार राज्यातही ११ सप्टेंबरपासून या लसीचा वापर थांबविण्यात आलेला आहे. केंद्र्र शासन हा विषय जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने गांभीर्याने हाताळत आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेनुसार टाईप २ विषाणूचा अधिशयन (इन्क्युबेशन) कालावधी साधारणत: दोन ते पाच आठवड्यांचा असतो, हे लक्षात घेता राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Web Title: A high-level meeting in Delhi today regarding 'those' defective polio vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.