हायकोर्ट : आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांचा जामीन अर्ज खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:57 IST2019-11-08T22:54:33+5:302019-11-08T22:57:05+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला.

हायकोर्ट : आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांचा जामीन अर्ज खारीज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीचे माजी आमदार आनंद गेडाम यांनी अपहरण व दरोडा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.
गेडाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. गेल्या १० ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवार बग्गू ताडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी आनंद गेडाम, त्यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम, पंकज तुलावी, जीवन नाट यांच्यासह एकूण दहा आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६५, ३४१, ३४२, ३९२, १४३, १४७ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. निवडणुकीत ताडाम यांची उमेदवारी धोकादायक ठरू शकते म्हणून आरोपींनी ताडाम व त्यांच्या साथिदारांचे अपहरण केले. तसेच, त्यांना मारहारण केली अशी पोलीस तक्रार आहे.