हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:22 IST2018-10-03T23:22:04+5:302018-10-03T23:22:45+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. तसेच, या दोघांनाही येत्या सोमवारी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होण्यास सांगितले. तसेच, पुढील सुनावणीनंतर आवश्यक आदेश जारी केला जाईल, असे स्पष्ट केले.

High Court: Confiscate the assets of the school President and Headmistress | हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा

हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा

ठळक मुद्देअवमानना प्रकरणात आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. तसेच, या दोघांनाही येत्या सोमवारी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होण्यास सांगितले. तसेच, पुढील सुनावणीनंतर आवश्यक आदेश जारी केला जाईल, असे स्पष्ट केले.
या दोघांविरुद्ध शिक्षिका छाया हागे यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चंद्रपूर येथील शालेय न्यायाधिकरणने हागे यांच्यासह अन्य बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्याचे व त्यांना बडतर्फीच्या काळातील वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाविरुद्ध शाळा व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ४ आॅक्टोबर २०१७ रोजी उच्च न्यायालयानेही हागे व अन्य कर्मचाºयांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार, बडतर्फीच्या काळातील वेतन अदा करण्याच्या आदेशाचे शाळा व्यवस्थापनाने पालन केले नाही. त्यामुळे हागे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याचिकाकर्तीच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश मेघे यांनी बाजू मांडली.

Web Title: High Court: Confiscate the assets of the school President and Headmistress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.