शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नागपूरच्या गोंड राजांचा घाट कधी बनणार ‘राजघाट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:06 IST

नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे.B

ठळक मुद्देसमाधींची दुरवस्थाअतिक्रमणामुळे हेरिटेजला धोका

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे. गोंड राजांचा हा घाट ‘राजघाट’ बनावा अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा राजघाट दुर्लक्षित पडला आहे. ३० जुलै रोजी गोंड राजा बख्तबुलंद शाह यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महापालिकेने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.गोंड राजे बख्तबुलंद शाह यांनी १६६८ ते १७०६ या कालावधीत ३८ वर्षे राज्य केले. त्यांनी १७०२ मध्ये नागपूर नगरीची स्थापना केली. सक्करदरा येथे गोंड राजांची विशाल स्मशान भूमी होती. राजघराण्यातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीत त्यांना दफविण्यात येत होते. या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता फक्त २९ समाधी अस्तित्वात आहे. या समाधीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे.जागेची मालकी नगर भूमापन विभागाचे मालमत्ता पत्रकानुसार न.भू. क्र.१७५ वर नागपूर सुधार प्रन्यास च्या नावाची अनधिकृत नोंद आहे. तसेच महानगरपालिकेच्या वारसा (हेरिटेज) यादी क्र.५२ वर ‘गोंड स्मशानभूमी’ असा उल्लेख आहे तसेच ‘शहा परिवार’ यांची मालकी दाखविली आहे. गोंड स्मशान भूमी अतिक्रमणमुक्त करून ‘राजघाट’ चा दर्जा देऊन सौंदर्यीकरण करण्यात यावे व ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. यासंदर्भात नेहरूनगर झोन स.आयुक्त यांचेसोबत संघटनेची बैठक झाली आहे. त्यांनी महानगर पालिकेला शहा परिवार व नागपूर सुधार प्रन्यास यांनी आपली मालकी सोडून जागा हस्तांतरित केल्यास राजघाटप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यात येणार असे सांगितले. नागपूर मनपा आयुक्त यांना शहा परिवारचे वीरेंद्र शहा यांनी हस्तांतरण करण्याची संमती दिली, एनआयटीनेसुद्धा संमती दिली आहे. मात्र मनपाच्या स्थावर (इस्टेट) विभागात राजघाटाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.गोंडवानाचा वैभवशाली इतिहास असलेल्या गोंड राजे यांचा राजघाट अतिक्रमण व दुर्लक्षित आहे. त्याचा तात्काळ राजघाटप्रमाणे विकास करून भावी पिढीकरिता वारसा जपावा. हे राजघाट आदिवासींचा ऐतिहासिक वारसा आहे. राजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेने यासंदर्भात ठोस पाऊल उचलावे.- दिनेश शेराम, अध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासीविकास परिषद नागपूर विभाग

टॅग्स :nagpurनागपूर