नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; सुमारे ८००० कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती

By शुभांगी काळमेघ | Updated: June 13, 2025 19:48 IST2025-06-13T19:48:17+5:302025-06-13T19:48:41+5:30

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

Helicopter manufacturing factory to be set up in Nagpur; Investment of around Rs 8000 crores, 2000 jobs to be created | नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; सुमारे ८००० कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती

Helicopter manufacturing factory to be set up in Nagpur; Investment of around Rs 8000 crores, 2000 jobs to be created

नागपूर :नागपूर शहरात सुमारे ८,००० कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामध्ये सामंजस्य करार झाला असून, हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला.


महाराष्ट्रात पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प
या कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये २०२६ पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरु करणार आहे. आठ वर्षांमध्ये होणाऱ्या या प्रकल्पात सुमारे ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, २,००० लोकांना रोजगार संधी निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे नागपूरचे संरक्षण उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत होणार असून, राज्य सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.


प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • रोटरी विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग या क्षेत्रासाठी हा प्रकल्प 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून कार्य करेल.
  • प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
  • नागपूर विमानतळाजवळ प्रकल्प राबविल्यामुळे लोकेशन आणि लॉजिस्टिकचे प्रगत फायदे मिळतील.
  • महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, यामुळे राज्य हे एरोस्पेस उद्योगासाठी एक केंद्रबिंदू म्हणून विकसित होईल.


“मॅक्स एरोस्पेसने महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. राज्य शासन या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा देईल. नागपूरमध्ये संरक्षण उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे.”
- देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री 


“मी मूळचा महाराष्ट्रातील असून, या राज्यातच उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि आम्ही राज्य सरकारच्या सहकार्याने हेलिकॉप्टर उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत.”
- भरत मलकानी, अध्यक्ष मॅक्स एरोस्पेस 
 

Web Title: Helicopter manufacturing factory to be set up in Nagpur; Investment of around Rs 8000 crores, 2000 jobs to be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.