सीताबर्डी उड्डाणपूलावरुन अवजड वाहनांना आता नो एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:34 IST2025-10-27T19:32:08+5:302025-10-27T19:34:03+5:30
Nagpur : भविष्यात जीवितहानी व धोका टाळण्यासाठी या पुलावरुन सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

Heavy vehicles now have no entry on Sitabardi flyover
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी येथील आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल हा हलक्या वाहनांसाठी असून अवजड वाहने पूलावरुन नेण्यास मनाई करण्यात आली आहे. अवजड वाहनामुळे यापूर्वी पुलावर लावण्यात आलेल्या उंचीच्या मर्यादेची बॅरीअर अनेकदा क्षतीग्रस्त झाले आहे.
भविष्यात जीवितहानी व धोका टाळण्यासाठी या पुलावरुन सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. यानंतर कुठल्याही प्रकारची जड वाहने पूलावरुन जाणार नाही याची दक्षता वाहनचालकांनी घ्यावी, असे जाहीर आवाहन जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.