शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दमदार बरसल्या मेघधारा : २८.५ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:36 IST

विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला.

ठळक मुद्देआज होणार मान्सून सक्रिय ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला. सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणीदेखील साचले होते. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली.

मागील वर्षी शहरात २२ जून रोजी मान्सून सक्रिय झाला होता व त्याच्या दुसऱ्या दिवशी घोषणा झाली होती. यावर्षी चांगला पाऊस येण्याचा अंदाज आहे. जर शनिवारी मान्सून शहरात सक्रिय झाल्याची घोषणा झाली तर यंदा मान्सूनमध्ये सरासरीहून चार दिवसाचाच विलंब नोंदविण्यात येईल.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबावामुळे मान्सूनने गती पकडली व पूर्व विदर्भातून मान्सूनने पुढे मार्गक्रमण केले. शुक्रवारी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा येथे मान्सून पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे.
विदर्भात २४ तासात सक्रिय होणार मान्सूनविदर्भातील काही जिल्ह्यात मान्सून पोहोचला आहे. यात गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. नागपूरसह उर्वरित जिल्ह्यात मान्सून २४ तासात सक्रिय होण्याच अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळेच मान्सूनला गती मिळाली आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर