लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या चार दिवसांपासून पश्चिम विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून चार जिल्ह्यांत हाहाकार उडाला आहे. यवतमाळसह पश्चिम वन्हाडातील तिन्ही जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे पूर्व विदर्भाच्च्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाठसाने थैमान घातले आहे. पुरामुळे दोन लाखांच्यावर हेक्टरमधील शेती पाण्याखाली आली असून ६०० च्यावर घरांची नासधूस झाली आहे.
गेले चार दिवस पश्चिम कन्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी व पुरामुळे अकोला जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये ३८९ घरांची पडझड झाली आहे. तसेच ५९ हजार २८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, दोन तालुक्यांत २६ अनावरांचा मृत्यू झाला आहे. काटेपूर्णां धरणाचे १० दरवाजे प्रत्येकी ६० सेंटिमीटर उचडण्यात आले आहेत. मोर्णा आणि निर्गुणा धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात भिंत कोसळून रविवारी एका तीन वर्षीय वालिकेचा मृत्यू झाला.
बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यांत पावसाचा तडाखा बसला. यंदाच्या पाठसाळ्यात प्रथमच खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले. पेनटाकळी प्रकल्पाचे ९ दरवाजे प्रत्येकी ३० सेंटिमीटर उघडण्यात आले आहेत. चिखली, मेहकर तालुक्यात नाल्यावरील पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले. चिखली तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने कहर केला आहे. उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांत सर्वाधिक पाऊस कोसळत आहे. उमरखेड जाणारा मार्गही बंद असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पळशी, संगम चिंचोलीमध्ये पुरस्थिती. ईसापूर धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले. खरबी ते किनवट या मार्गावरील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर असल्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद आहे.
१६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या पावसाने १५ जनावरांचा मृत्यू झाला. शिवाय तीन हजार ३६५ घरांची पडझड झाली असून, ८० हजार ७२३.५९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. महागाव, घाटंजी, आणी, झारी, पुसद है तालुकेसुद्धा पुरामुळे बाधित झाले आहे.