भीषण उष्णतेत विजेचा फटका : गोरेवाडा सबस्टेशनचे सात फिडर खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST2019-05-26T00:13:28+5:302019-05-26T00:14:19+5:30
शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.

भीषण उष्णतेत विजेचा फटका : गोरेवाडा सबस्टेशनचे सात फिडर खराब
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.
वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलनुसार जवळपास चार हजार वीज ग्राहकांची वीज गायब होती. यापूर्वी पश्चिम नागपुरातील अनेक भागांमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे सकाळी ११ वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडा, एकतानगर, बोरगाव, बरडे ले-आऊट, केटीनगर, फ्रेण्ड्स कॉलनीपासून गिट्टीखदानपर्यंत तर अनंतनगरपासून झिंगाबाई टाकळीपर्यंतच्या परिसरातील वीज गेली. काही भागांना दुसऱ्या फिडरवरून जोडून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विजेचे येणे-जाणे सुरू होते. सायंकाळी ६ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. म्हणजेच भीषण उष्णतेत सकाळी ११ पासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना राहावे लागले. वीज गेल्याबाबत एसएनडीएल कार्यालयात फोन केल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचाही अनेकांनी आरोप केला आहे.