एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भिषण आग

By मंगेश व्यवहारे | Updated: March 28, 2024 14:07 IST2024-03-28T14:07:03+5:302024-03-28T14:07:19+5:30

घटनास्थळी पोहचताच लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट वाहत होते.

heavy fire at l and t logistics park nagpur | एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भिषण आग

एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भिषण आग

मंगेश व्यवहारे, नागपूर :  अमरावती रोडवरील १४ मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला दुपारी १२ वाजताच्या सुमारास भिषण आग लागली आहे. घटनेचा कॉल अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर लगेच सिव्हील लाईन अग्निशमन केंद्रातून ३, कळमेश्वर, वाडी व मिहान येथून प्रत्येकी एक अग्निशमनचे फायर टेंडर घटनास्थळाकडे रवाना झाले.

घटनास्थळी पोहचताच लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट वाहत होते. आतमध्ये ऑईलचे टँकर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आग चांगलीच धुमसत आहे. अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आगीमुळे लॉजिस्टीक पार्कचे टीनाचे संपूर्ण शेड खाली बसल्याने अग्निशमनच्या पथकाला अडचण येत आहे. उन्हाळा सुरू झाला की शहरात आगी लागण्याच्या घटना वाढतात.  दोन दिवसापूर्वी खडगाव रोडवरील आंचल प्लास्टीक कंपनीला आग लागली होती. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: heavy fire at l and t logistics park nagpur

टॅग्स :fireआग