शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ऊन्हाचा तडाखा, विजेचा वापर वाढला अन् भरमसाठ वीज देयक आले; आपले देयक आपणच तपासा

By आनंद डेकाटे | Updated: April 8, 2024 15:37 IST

वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्री करता येते.

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काही दिवसांपासून नागपूरसह राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केली जाते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्रीही करता येते.

प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे. त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की, विजेचे बिलही वाढणार आहे. मात्र आपल्या हातात एप्रिल, मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बिल भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल.

त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या, आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता. १००० वॅटचे उपकरणाचा जर एक तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते.

- वीज वापराबाबतचा तक्ताप्रकार : वीज वापर (वॅट्स) एक युनिट विजेसाठी लागणारा वेळ

  • पंखा : ३६ इंच - ६० - १६ तास ४० मिनीट
  • पंखा : ४२ इंची ८० - १२ तास ३० मिनीट
  • टेबल फॅन : ४० - २५ तास
  • मिक्सर, ज्युसर - २ तास १३ मिनीट
  • इलेक्ट्रीक ओव्हन - ५० मिनीट
  • इस्त्री – कमी वजन - ६० मिनीट
  • इस्त्री जास्त वजन - ३० मिनिट
  • टीव्ही १५ - तास ४० मिनिट
  • वॉशिंग मशीन स्वयंचलित - ३० मिनीट
  • सेमी स्वयंचलित - २ तास ३० मिनीट
  • व्हॅक्यूम क्लिनर - १ तास
  • संगणक - ४ तास
  • वॉटर प्युरिफायर - ४० दिवस
टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज