शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

खाकी वर्दीवरच वडाच्या झाडाला घातले फेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:08 IST

पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. छान साडी घालून सजण्याची उसंत मिळाली नाही, मग कर्तव्याची वेळ आणि स्थितीची सांगड घालून या महिला पोलिसांनी वर्दीवरच वडाची पूजा करीत परंपरेचीही जबाबदारी पूर्ण केली.

ठळक मुद्देकर्तव्य बजावताना निभावला पत्नीधर्म : महिला पोलिसांचे भावनिक रूप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वटपौर्णिमेचा सण हा भारतीय स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा. वडाच्या झाडाला सूत बांधत फेऱ्या मारताना आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो ही त्या परंपरेमागे असलेली महिलेची भावना. महिलांचा सण म्हटले की थोडे सजूनसवरून तो साजरा करण्याची इच्छा तर होईलच. मात्र पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. छान साडी घालून सजण्याची उसंत मिळाली नाही, मग कर्तव्याची वेळ आणि स्थितीची सांगड घालून या महिला पोलिसांनी वर्दीवरच वडाची पूजा करीत परंपरेचीही जबाबदारी पूर्ण केली.कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात प्रत्येकाचा संयमाचा बांध तुटतो आहे. मात्र डॉक्टरांसोबत दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणारे खाकी वर्दीतील योद्धा आपली जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. कर्तव्यावर कधीही निघावे लागते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठराविक वेळा नाहीत. अशाही स्थितीत महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पुरुषांप्रमाणे २४ तास कर्तव्यावर तैनात आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकरिता कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे. साहजिकच कर्तव्य बजावताना कुटुंबालाही सांभाळण्याची यशस्वी धडपड त्या करीत आहेत. शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण आला तेव्हाही त्यांची भावनिक आस्था दिसली. वटपौर्णिमेच्या दिवशी साधारणत: महिला साजशृंगार करून वडाची पूजा करतात. मात्र कर्तव्यवर तैनात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही यातूनही मार्ग काढला. पर्यावरणदिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने आज झाडांची पूजा व्हावी असे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात आले. कर्तव्य महत्त्वाचे असल्याने वेळ नव्हताच. मग वर्दीवरच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला. वर्दीवर झालेली त्यांची पूजा कुतूहलाचा विषय ठरली पण तेवढीच अभिमान वाटावे असेच हे दृश्य होते. संकट मोठे आहे पण आमच्या परंपरा आणि भावनिक मजबुती तोडू शकत नाही हेच यातून या कोरोना वॉरियर्सनी दाखविले.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिस