एमडीची विक्री करायला गेले अन पोलिसांच्या सापळ्यात अडकले
By योगेश पांडे | Updated: May 8, 2023 17:32 IST2023-05-08T17:32:14+5:302023-05-08T17:32:37+5:30
Nagpur News एमडी पावडरची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.

एमडीची विक्री करायला गेले अन पोलिसांच्या सापळ्यात अडकले
योगेश पांडे-
नागपूर : एमडी पावडरची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.
अर्शद अकबर सैय्यद (२२, ओलिया नगर, मोठा ताजबाग) व जुनैद अफसर खान (२१, हसनबाग) अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही आरोपी एमडी घेऊन जाणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या मार्फत मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व डागा इस्पितळाच्या दरवाजासमोर दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ५.६ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्याची किंमत १६ हजार ८०० रुपये इतकी आहे. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल असा एकूण १.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.