मित्रासोबत फिरायला गेला अन् तलावात उडी घेत जीवच दिला

By योगेश पांडे | Published: October 2, 2023 04:57 PM2023-10-02T16:57:50+5:302023-10-02T16:59:10+5:30

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

He went for a walk with a friend and died by jumping into the lake | मित्रासोबत फिरायला गेला अन् तलावात उडी घेत जीवच दिला

मित्रासोबत फिरायला गेला अन् तलावात उडी घेत जीवच दिला

googlenewsNext

नागपूर : मित्रासोबत फुटाळा तलावाजवळ फिरायला गेलेल्या एका तरुणाने अचानकपणे तलावात उडी घेत आत्महत्या केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती व अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शंकर रामदास बडवाईक (३०, माऊलीनगर, वाडी) असे मृतकाचे नाव आहे. तो मुळचा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेजवळील सावंगी येथील रहिवासी होता. मागील काही काळापासून तो नागपुरात होता. रविवारी तो मित्रासह फुटाळा तलावाजवळ फिरायला गेला होता. अचानक तो तलावाच्या भिंतीवर उभा झाला व त्याने डोळ्याचे पाते लवते न लवते तो पाण्याच उडी घेतली. त्याच्या मित्राने आरडाओरड केली व घटनास्थळावरील लोकांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला सूचना दिली.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तलावाबाहेर काढले. तो काहीच हालचाल करत नसल्याने त्याला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा भाऊ आकाश याच्या सूचनेवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: He went for a walk with a friend and died by jumping into the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.