डोळ्यात मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 19:47 IST2021-12-25T19:47:05+5:302021-12-25T19:47:30+5:30

Nagpur News डोळ्यात मिरचीपूड फेकून एका गुंडाने सलूनमध्ये दाढी करत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

He threw chili powder in his eye and snatched the gold chain | डोळ्यात मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावून नेली

डोळ्यात मिरचीपूड फेकून सोनसाखळी हिसकावून नेली

ठळक मुद्देसलूनच्या दुकानात लूटमार

नागपूर - डोळ्यात मिरचीपूड फेकून एका गुंडाने सलूनमध्ये दाढी करत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

आश्विन अपार्टमेंट कोतवालनगरमधील रहिवासी मनीष यशवंत पाटील (वय ५३) शनिवारी रात्री ७ च्या सुमारास गणराज हेअर सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेले. ते चेअरवर बसून असताना खामल्यातील सिंधी कॉलनीत राहणारा भरत कश्यप नावाचा गुन्हेगार तेथे आला. त्याने पाटील यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून गेला. विशेष म्हणजे, पाटील यांची दाढी बनविणारा आणि अन्य काही ग्राहक बाजूला उभे होते. मात्र, कुणीच आरोपीला रोखले नाही. पाटील यांच्या तक्रारीवरून पीएसआय पवार यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: He threw chili powder in his eye and snatched the gold chain