समजदारांच्या मतलबी दुनियेसाठी तो ठरला आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:52 PM2018-08-30T23:52:19+5:302018-08-30T23:56:17+5:30

मनोरुग्णांच्याप्रति अनेक गैरसमज आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्ण बरे होऊनही नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नाही. काही नातेवाईक अशा रुग्णांना भरती करताना खोटे पत्ते देतात. यातील काही प्रकरणांमध्ये समाज काय म्हणेल, हे कारणे देतात. परंतु नानसिंगच्या बाबतीत हे सर्वच खोटे ठरले. मेडिकलमध्ये आपली मनोरुग्ण पत्नी उपचार घेत असल्याची माहिती मिळताच तो तातडीने ६०० किलोमीटर अंतर कापून आला. समजदारांच्या मतलबी दुनियेसाठी तो आदर्श ठरला.

He proved himself to be ideal for selfish world | समजदारांच्या मतलबी दुनियेसाठी तो ठरला आदर्श

समजदारांच्या मतलबी दुनियेसाठी तो ठरला आदर्श

Next
ठळक मुद्दे मनोरुग्ण पत्नीसाठी पती आला धावून : मेडिकलच्या समाजसेवा अधीक्षकांचा माणुसकीचा परिचय

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनोरुग्णांच्याप्रति अनेक गैरसमज आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्ण बरे होऊनही नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नाही. काही नातेवाईक अशा रुग्णांना भरती करताना खोटे पत्ते देतात. यातील काही प्रकरणांमध्ये समाज काय म्हणेल, हे कारणे देतात. परंतु नानसिंगच्या बाबतीत हे सर्वच खोटे ठरले. मेडिकलमध्ये आपली मनोरुग्ण पत्नी उपचार घेत असल्याची माहिती मिळताच तो तातडीने ६०० किलोमीटर अंतर कापून आला. समजदारांच्या मतलबी दुनियेसाठी तो आदर्श ठरला.
३ आॅगस्ट रोजी एक २३ वर्षीय अनोळखी महिला अकोला मेडिकलमधून रुग्णवाहिकेतून नागपूर मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल झाली. तिच्या डोक्याला जबर मार होता. ‘ट्रॉमा’च्या चमूने योग्य ते उपचार करून वॉर्ड क्रमांक १८ मध्ये भरती केले. युनिट इंचार्ज डॉ. आरती मित्रा यांनी जातीने लक्ष घालून उपचाराला दिशा दिली. हळूहळू तिच्यात सुधारणा होऊ लागली. डोक्याला मार असल्यामुळे तिला फारसे काही आठवत नव्हते. समाजसेवा अधीक्षक शशिकांत नागपुरे व त्यांच्या चमूने रुग्णाला सातत्याने भेटी देऊन बोलते केले. परंतु तिचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिला पत्ता नीट सांगता येत नव्हता. समाजसेवा अधीक्षक श्याम पंजाला यांनी तिने सांगितलेला मोडक्यातोडक्या पत्त्यावर काम करणे सुरू केले. बऱ्याच प्रयत्नानंतर छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील ती रहिवासी असल्याचे समजले. तेथील पोलीस अधीक्षकांना याबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी मनेंद्रगड पोलीस निरीक्षक कमल शुक्ला यांना याची माहिती दिली आणि नेमका पत्ता जुळून आला. ही महिला अतिदुर्गम असलल्या डगौर या आदिवासीबहुल गावातील रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना सूचना दिल्या. तिचा पती नानसिंग यांना याची माहिती मिळताच नागपूरसाठी रवाना झाला. ६०० किलामीटरचे अंतर कापून तो नागपुरात आला. तब्बल आठ महिन्यानंतर समोर पत्नीला पाहत नानसिंग यांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता. तो म्हणाला, मानसिक स्थिती बरोबर नसल्याने ती घरून निघाली. आठ महिने झाले तरी तिचा रोज शोध घेणे सुरूच होते.
मनोरुग्ण पत्नी असली तरी तिच्या प्रेमाखातर धावून आलेला अल्पशिक्षित नानसिंग समाजासाठी आदर्श असल्याचे मत,समाजसेवा विभागाचे समन्वयक किशोर धर्माळे यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रक्रियेत जनऔषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. उदय नार्लावार व प्रभारी डॉ. अविनाश गावंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Web Title: He proved himself to be ideal for selfish world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.