गंमतीने लावला गळफास; मुलाचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 21:58 IST2022-06-01T21:57:56+5:302022-06-01T21:58:34+5:30
Nagpur News दारुड्या शेजाऱ्याने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर गंमत म्हणून मुलाने गळफास लावला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गंमतीने लावला गळफास; मुलाचा गेला जीव
नागपूर : दारुड्या शेजाऱ्याने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर गंमत म्हणून मुलाने गळफास लावला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दफई किरणापूर येथे मंगळवारी (दि.३१) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
साहील भाेलाजी मेश्राम (११, रा. दफई किरणापूर, ता. सावनेर) असे मृत मुलाचे नाव आहे. साहीलने शेजारी राहणारा अनिल नेवारे याला दारूच्या नशेत गळफास घेताना पाहिले हाेते. त्याचे पाहून साहीलनेही गंमत म्हणून गळफास लावून पाहिला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलीप लखनसिंग टंडन (४०, रा. दफई किरणापूर, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार गंगाधर ठाकरे करीत आहेत.