... त्याने तिला आधी मोबाईल दिला, नंतर पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 20:15 IST2020-07-07T20:14:42+5:302020-07-07T20:15:15+5:30
एका अल्पवयीन मुलीला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याची घटना येथे घडली.

... त्याने तिला आधी मोबाईल दिला, नंतर पळवून नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अल्पवयीन मुलीला आधी मोबाईल घेऊन दिला आणि नंतर तिला पळवून नेले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. आरोपीचे नाव आकाश ऊर्फ बाका सहारे (वय २२) आहे. याच वस्तीत राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. ही ओळख पुढे अधिक घट्ट झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. या मुलीच्या प्रेमाखातर आरोपीने तिला काही दिवसांपूर्वी मोबाईल घेऊन दिला होता. मुलीच्या वडिलांना ते कळल्यानंतर त्यांनी आरोपीला हटकले. त्यामुळे आरोपीने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास तिला पळवून नेले. त्याचप्रमाणे तिच्या वडिलांना धमकी देऊन गप्प राहण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.