शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:05 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ताज अहमद राजा अली अहमद यांची रिट याचिका खारीज केल्यामुळे ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

ठळक मुद्देहायकोर्ट : विकासकामांविरुद्धची याचिका खारीज केली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ताज अहमद राजा अली अहमद यांची रिट याचिका खारीज केल्यामुळे ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला. अहमद यांनी सौंदर्यीकरण आराखडा व अन्य विविध बाबींवर आक्षेप घेतला होता.राज्य सरकारने हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सौंदर्यीकरणासाठी १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सौंदर्यीकरण आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नागपूर सुधार प्रन्यासची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विकासकामांवर लक्ष ठेवण्यासाठी २० एप्रिल २०१३ रोजी समिती स्थापन करण्यात आली. १६ जुलै २०१३ रोजी समितीने प्रभावित दुकानदार व इतरांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुकानदारांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. त्या कॉम्प्लेक्सचा आराखडा मंजूर नाही. तसेच, कॉम्प्लेक्समध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत असे अहमद यांचे म्हणणे होते.१५ ऑक्टोबर २०१६ रोजी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक हे अधिकारांच्या बाहेर जाऊन कार्य करीत आहेत. परंतु, सरकारचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष आहे असा आरोप अहमद यांनी केला होता. सरकारने सौंदर्यीकरणाचे काम स्वत:च्या निरीक्षणाखाली पूर्ण करावे, विकास आराखडा मंजूर करून झालेली चूक सुधारण्यात यावी, आराखडा मंजूर होतपर्यंत कोणतेही काम करू नये व ट्रस्टवर नऊ विश्वस्तांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती अहमद यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने अहमद यांना ही याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही असे सांगून त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTajbagh Dargah, bigताजाबाद दर्गा (मोठा)