शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:36 IST

उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १ ‘मिलियन’ म्हणजेच १० लाखांचा टप्पा ओलांडला.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावरील गर्दी वाढतेय : ‘एमआयएल’ला ५५ कोटींहून अधिकचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण केलेल्या प्रवाशांच्या संख्येने चक्क १ ‘मिलियन’ म्हणजेच १० लाखांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जवळपास त्याच संख्येत शहरात प्रवासी दाखलदेखील झाले. या वर्षात ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) ५५ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नागपूर विमानतळावरून किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत नागपूर विमानतळावरून १० लाख ४७ हजार १६१ प्रवाशांनी उड्डाण केले, तर १० लाख १४ हजार १८८ प्रवासी शहरात आले. सरासरी दररोज २ हजार ८६८ प्रवाशांनी शहरातून उड्डाण भरले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शहराबाहेर जाणारे व शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या १० लाखांच्या पार गेली आहे. २०१६ मध्ये ९ लाख ३१ हजार ५२३ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून उड्डाण भरले होते.दिवसाला सरासरी २४ विमानांचे ‘लॅन्डिंग’२०१७ मध्ये ७ हजार ५९७ ‘शेड्यूल्ड फ्लाईट्स’ व १ हजार ३०६ ‘नॉन शेड्यूल्ड फ्लाईट्स’ नागपूर विमानतळावर उतरली, तर त्याच संख्येत विमाने व हेलिकॉप्टर्स उडाली. जर आकडेवारीचा हिशेब केला तर सरासरी दिवसाला २४ विमानांनी नागपूर विमानतळावर ‘लॅन्डिंग’ केले.महसुलात झाली वाढवर्षभरात विमानांच्या दळणवळणातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ३५ कोटी ८१ लाख ६७ हजार २४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा महसूल प्रामुख्याने ‘लॅन्डिंग’, ‘पार्किंग’, ‘पीएसएफ’ (पॅसेंजर सर्व्हिस फी) आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळाला. विमानांच्या ‘लॅन्डिंग’पासून ११ कोटी ७६ लाख ८१ हजार ३० रुपयांचा महसूल प्राप्त झाला, तर ‘पीएसएफ’अंतर्गत २२ कोटी ११ लाख ४२ हजार ५५२ रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षी महसुलाचा हाच आकडा ३१ कोटी २४ लाख ८९ हजार ६९९ इतका होता. याशिवाय २०१७ मध्ये विमानतळाच्या आत व बाहेर ‘कमर्शियल’ उपक्रमांसाठी ‘एमआयएल’ला १२ कोटी ४९ लाख ६६ हजार ५६२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ‘एमआयएल’ला वर्षभरात एकूण ५५ कोटी १२ लाख १६ हजार ६५७ रुपयांचा महसूल मिळाला.वर्षभरात तेराशेहून अधिक खासगी विमानांचे ‘लॅन्डिंग’वर्षभरात विमानतळावर ‘लॅन्डिंग’ झालेल्यांपैकी १४.६६ टक्के विमाने व ‘हेलिकॉप्टर्स’ खासगी होते. २०१७ या वर्षभरात नागपूर विमानतळावर १ हजार ३०६ खासगी विमाने व ‘हेलिकॉप्टर्स’चे ‘लॅन्डिंग’ झाले. त्यांच्यापासून ५७ लाख ०६ हजार ३०८ इतका महसूल प्राप्त झाला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर