हरीश वरभे अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सच्या अध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:39 IST2018-04-03T21:39:05+5:302018-04-03T21:39:16+5:30
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.

हरीश वरभे अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सच्या अध्यक्षपदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली.
नागपूरची सर्वात जुनी वैद्यकीय संघटना म्हणून अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सची ओळख आहे. या संघटनेचे ५२ वे वर्ष आहे. यात २५०० पेक्षा जास्त विशेषज्ञ, सुपर स्पेशालिटी व तज्ज्ञ डॉक्टर हे सदस्य म्हणून आहेत. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १५ जुलै २०१८ रोजी होणार आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. हरीश वरभे म्हणाले, या वर्षभरात साधारण २५वर कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजन केले आहे. यामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, उपचारपद्धती याच्या माहितीसह, विविध आजारांबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक व डॉ. राजेश अटल, उपसचिव डॉ. प्रशांत रहाटे व डॉ. संजय चौधरी, डॉ. संजय जैन व पुढीलवर्षीचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल यांचा समावेश आहे. या शिवाय कार्यकारी समितीमध्ये डॉ.अनुराधा रिधोरकर, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. दिनेश सिंह, डॉ. दीपक जेस्वानी, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. मनीष बाहेती, डॉ. मनोज पहुकर, डॉ. मेघना अग्रवाल, डॉ. पटेल, डॉ. पंकज हरकुट, डॉ. सचिन देवकर, डॉ. सागर येलने, डॉ. सुशील मानधनिया, डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. वैशाली खंडाईत व डॉ. ठाकरे यांचा समावेश आहे.