हरीश लाेखंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:12+5:302021-04-19T04:08:12+5:30
नागपूर : माजी जिल्हा माहिती अधिकारी हरीश नागोजी लोखंडे (७३) यांचे शनिवारी निधन झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या भंडारा ...

हरीश लाेखंडे यांचे निधन
नागपूर : माजी जिल्हा माहिती अधिकारी हरीश नागोजी लोखंडे (७३) यांचे शनिवारी निधन झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या भंडारा व वर्धा या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. नागपुरातही माहिती सहायक म्हणून कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
मिलिंद पटवर्धन ()
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त उपअधीक्षक मिलिंद बाळकृष्ण पटवर्धन (६०, रा. गिरीपेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
सुरेश डाेनारकर ()
ॲड. सुरेश कृष्णराव डाेनारकर (५७) यांचे रायपूर येथे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.
मंगला दलाल ()
मंगला दलाल (५३, रा. याेगेश्वरनगर, दिघाेरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व तीन मुली आहेत.
संगीता वानखेडे ()
संगीता राजेश वानखेडे (४८, रा. खडगाव राेड, दत्तवाडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अमरावती येथे करण्यात आले.
रूपराव गिरहे ()
रूपराव गुणाजी गिरहे (९०, रा. वाघोडा, ता. पारशिवनी) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे आहेत.
उमेश मानकर ()
उमेश मधुकरराव मानकर (४९, रा. दुर्गानगर, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण चाेबे ()
नारायण गंगाधरराव चोबे (रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व दाेन मुले आहेत.
मिनल झिलपे ()
मिनल झिलपे-दिनेकर (३८, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व मुलगा आहे.
शरद नागुलकर ()
डाॅ. शरद सुधाकर नागुलकर (६२, रा. खामला) यांचे निधन झाले. ते आराेग्य विभागाचे निवृत्त सहायक संचालक हाेते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विन्सेंट मानिकुन्नेल ()
विन्सेंट जाेसेफ मानिकुन्नेल (६६, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व नात आहे.
अविनाश उगले ()
अविनाश विठ्ठलराव उगले (४८, रा. मानेवाडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व मुलगा आहे.
इंद्राणी पाण्डेय ()
इंद्राणी देवनारायण पाण्डेय (७८, रा. बँक काॅलनी, भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, तीन मुली व नातवंडे आहेत.
प्रभाकर डाेंगरे ()
प्रभाकर लक्ष्मणराव डाेंगरे (६५, रा. रेणुका मातानगर, हुडकेश्वर राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंदा राखुंडे ()
चंदा मधुकरराव राखुंडे (६१, रा. यशाेधरानगर, हिंगणा राेड) यांचे निधन झाले.
निर्मला राव ()
निर्मला राव (७९, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशाेक चरपे ()
अशोक मनोहर चरपे (५७, रा. नंदनवन हाऊ. बाेर्ड काॅलनी, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.