नागपुरात अंगणवाडीत लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:01 IST2020-06-27T01:00:16+5:302020-06-27T01:01:54+5:30

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

Hanged in Anganwadi in Nagpur | नागपुरात अंगणवाडीत लावला गळफास

नागपुरात अंगणवाडीत लावला गळफास

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी कुंभारपुऱ्यात राहणारे नरेश सीताराम देवीकर (वय ५२) यांनी घरासमोर असलेल्या अंगणवाडी केंद्राचे खिडकीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. रितिक नरेश देवीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. अशाच प्रकारे कपिल नगरातील सायली विलास निकोसे (वय २८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. १५ जूनला सायंकाळी ही घटना घडली होती. आरती वीरेंद्र मेंढे यांनी दिलेल्या सूचनेवरून गुरुवारी कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Hanged in Anganwadi in Nagpur