अर्ध्या शहरात उद्या पाणीपुरवठा नाही! कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाउन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:36 IST2025-01-09T16:35:08+5:302025-01-09T16:36:11+5:30
Nagpur : शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत शटडाऊन

Half the city will not have water supply tomorrow! Kanhan Water Purification Plant shutdown
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी विविध दुरुस्तीची कामे व व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे ३० तासांचे शटडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर, आशीनगर झोनमधील ३३ जलकुंभांवरून पाणीपुरवठा होणार नसल्याने शहराच्या अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जलकुंभ व पाणीपुरवठा विस्कळीत राहणाऱ्या वस्त्या
भरतवाडा जलकुंभ : देशपांडे ले- आऊट, आदर्शनगर झोपडपट्टी, हिवरी कोटा, शैलेशनगर, देवीनगर, कामाक्षीनगर, सदाशिवनगर, वाठोडा बस्ती, घर संसार सोसायटी, सालासर विहार कॉलनी, न्यू सूरजनगर, संघर्षनगर
कळमना जलकुंभ : पुंजारामवाडी, वैरागडेवाडी, बाजार चौक, गोपालनगर, संजयनगर, साखरकर वाडी, चिखली बस्ती, एनआयटी क्वॉर्टर, चिखली ले- आऊट इंडस्ट्रियल एरिया, कुंभारपुरा, खापरे मोहल्ला, नागराज चौक.
सुभाननगर भरतवाडा जलकुंभ : साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भरतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भरतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रनगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, अभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर.
मिनिमाता भरतवाडा जलकुंभ : मिनिमातानगर, जानकीनगर, पंच झोपडा, जालारामनगर, सूर्यानगर, एसआरए योजना, जनता कॉलनी, चिखली ले-आऊट इंडस्ट्रियल एरिया.
भांडेवाडी भरतवाडा जलकुंभ: पवनशक्तीनगर, अब्बुमियाँनगर, तुलसीनगर, अंतुजीनगर, मेहरनगर, साहिलनगर, सरजू टाऊन, कांधवानी टाऊन, वैष्णोदेवीनगर, श्रावणनगर, महेशनगर, सूरजनगर.
बाभूळबन भरतवाडा जलकुंभ : हिवरीनगर, पाडोळेनगर, पँथरनगर, पाडोळेनगर झोपडपट्टी, हिवरीनगर झोपडपट्टी, शास्त्रीनगर झोपडपट्टी, बाभूळबन, शिवाजी सोसायटी, ईडब्ल्यूएस कॉलनी, एमआयजी, एलआयजी कॉलनी, शास्त्रीनगर, दत्तानगर, कुंभारटोळी, वर्धमाननगर, ईस्ट वर्धमाननगर, ट्रान्सपोर्टनगर.
पारडी भरतवाडा जलकुंभ : महाजनपुरा, खाटिकपुरा, कोष्टीपुरा, दीपनगर, शेंडेनगर, अंबेनगर, विनोबा भावेनगर, बीएच दुर्गानगर, गोंड मोहल्ला, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमाननगर, ठवकर वाडी, सद्गुरूनगर, राणी-सती सोसायटी.
लकडगंज भरतवाडा जलकुंभ १: जुनी मंगलवारी, भुजडे मोहल्ला, चिंचघरे मोहल्ला, स्विपर कॉलनी, माताघरे मोहल्ला, मट्टीपुरा, हट्टीनाला, गरोबा मैदान, दिगोरीकर चौक, कापसे चौक, धवडे मोहल्ला, माटे चौक, चापरूनगर, हरिहरनगर, जगजीवनरामनगर, जुना बगडगंज, बजरंग नगर, गुजरनगर, कुंभारटोळी.
लकडगंज भरतवाडा जलकुंभ २: सतरंजीपुरा, गंगाजमुना, रामपेठ, बुद्धापुरा, कुंभारपुरा, लकडगंज ले-आऊट, एव्हीजी ले-आऊट, सतनामीनगर, शाहू मोहल्ला, भगवतीनगर, स्मॉल फॅक्टरी एरिया, भाऊरावनगर, धनगंज स्विपर कॉलनी, सुदर्शननगर, चापरूनगर चौक.