शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:54 AM

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.सायंकाळी पावसाला सुरुवात होताच एक-एक फिडर बंद पडू लाले. महावितरणच्या काँग्रेस नगर डिव्हीजनमधील नरेंद्रगर, रिंग रोडसह एसएनडीएलचे बहुतांश भाग अंधारात डुबले होते. तुकडोजी पुतळा, मानेवाडा, रेशीमबाग गणेशनर, बगडगंज, आयुर्वेदिक ले-आऊट, उमरेड रोड, पारडी, वाठोडा, उप्पलवाडी, एस.टी. स्टँड, गांधीबग, गोरेवाडा, बोरगाव, ओंकारनगर, बेसा, जाफरनगर, केटीनगर, हरीहर मंदिर, मॉडेल मिल, अनमोलनगर, क्लॉर्क टाऊन आदी परिसर अंधरात होते. दक्षिण नागपूर तर पूर्णत:च अंधारात होते. अनेक तासांपासून वीज नसल्याने नागरिकही संतापले होते. या संतापाचा भडका वितरण कंपनीच्या अनेक कार्यालयाबाहेर दिसून आला. मानेवाडा चौकातील कार्यालयाबाहेर नागरिक एकत्र आले होते. पोलिसांना बोलवावे लागले होते. वीज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त न झाल्यास रविवारी संतप्त नागरिकांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज ग्राहकांनी संयम राखवाशहर व जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंते प्रयत्न करीत आहे. पावसाचा जोर कमी होताच युद्धस्तरार काम करीत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अजूनही ते केले जात आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.... तर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीपावसाळ्यात वीज जाऊ नये यासाठी मान्सूनपूर्व तयारी करून घ्यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात धोकादायक वृक्षांची कटाई, छाटणी आदी कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आजची परिस्थिती पाहता ती कामे झालीच नसल्याचे दिसून येते. आमदारांनी निर्देश देऊनही कामे होत नाही हे गंभीर आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण नागपूर अंधारात होते. ठिकठिकाणी झाडे पडल्यान विजेच्या तारा तुटल्या होत्या. नागरिक संतप्त . सातत्याने फोनवर फोन येत होते. तब्बल ५२ फिडर बंद पडल्याचे सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वीच असे हाल असतील तर पावसाळ्यात काय होणार? तातडीने वीज पुरवठा झाला नाही. आणि यंत्रणा सुधारली ही, तर कुणालाही सोडणार नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील.आ. सुधाकर कोहळेदक्षिण नागपूर

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर