शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'ज्ञानरथ'मुळे गावातच मुलांना एआय आणि कोडींगचे धडे; राज्यात पहिल्यांदाच धावणार 'एआय लॅब ऑन व्हील्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:29 IST

Nagpur : २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था आता 'डेटा' आणि एआयच्या पायावर उभी आहे. अशा काळात तंत्रज्ञानाचे वरदान केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे, या जिद्दीतून नागपूर जिल्हा परिषदेने 'एआय लॅब ऑन व्हील्स' म्हणजेच 'ज्ञानरथ' हा क्रांतिकारी उपक्रम सुरू केला आहे.

बालाजी देवर्जनकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था आता 'डेटा' आणि एआयच्या पायावर उभी आहे. अशा काळात तंत्रज्ञानाचे वरदान केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे, या जिद्दीतून नागपूर जिल्हा परिषदेने 'एआय लॅब ऑन व्हील्स' म्हणजेच 'ज्ञानरथ' हा क्रांतिकारी उपक्रम सुरू केला आहे.

महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिभाषेला पूर्णपणे 'रिबूट' करणारा हा पहिलाच प्रकल्प राज्यासाठी एक पथदर्शक 'डिजिटल मॉडेल' ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'ज्ञानरथ'चे लोकार्पण नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १,५१२ शाळांपैकी बहुतांश शाळा दुर्गम भागात आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये उपजत बुद्धिमत्ता असूनही केवळ संसाधनांच्या अभावामुळे ते जागतिक स्पर्धेत मागे पडू नयेत, ही दूरदृष्टी ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून ती पूर्णत्त्वास आणली. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या क्रांतिकारी 'ज्ञानरथ'चे लोकार्पण झाले.

'एआय लॅब ऑन व्हील्स!'ची स्मार्ट वैशिष्ट्ये

अत्याधुनिक लॅब : ६ हाय-स्पीड वर्कस्टेशन्स, १ इंटरेक्टिव्ह स्मार्ट पॅनल बोर्ड.नेक्स्ट-जेन टूल्स : प्रगत श्रीडी प्रिंटर आणि इमर्सिव्ह लर्निंगसाठी श्री व्ही. आर. सेट्स.कौशल्य केंद्र: कोडिंग, रोबोटिक्स आणि एआय लैंग्वेजेसचा प्रत्यक्ष सराव.

तंत्रज्ञानाचे 'डेमोक्रॅटायझेशन'

'एआय लॅब ऑन व्हील्स! केवळ फिरता संगणक संच नाही, तर ते 'फ्युचरिस्टिक' शिक्षणाचे फिरते दालन आहे. या विशेष बसमध्ये बसवलेले गॅजेट्स कोणत्याही प्रगत कॉर्पोरेट आयटी लॅबशी सुसंगत आणि समांतर आहेत.यामध्ये थ्रीडी प्रिंटर आहे, ज्याद्वारे मुले त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रत्यक्ष आकार देऊ शकतील. व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) सेट्सच्या माध्यमातून वर्गात बसूनच ते अंतराळ सफर किंवा समुद्राच्या तळाचा अभ्यास करू शकतील. कोडिंग किट्सच्या मदतीने लहान वयातच मुले 'अल्गोरिदम' आणि 'प्रोग्रामिंग'च्या भाषेत जगाशी संवाद साधतील. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी आता कोडिंग, रोबोटिक्स आणि एआय लँग्वेजेस शिकून प्रत्यक्ष सराव करू शकणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : AI Lab on Wheels: Bringing Tech Education to Rural Maharashtra

Web Summary : Maharashtra launches 'AI Lab on Wheels' ('Dnyanrath'), a pioneering initiative by Nagpur Zilla Parishad. It aims to democratize technology education, providing rural students access to AI, coding, and robotics through a mobile lab equipped with advanced tools.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सnagpurनागपूरStudentविद्यार्थीEducationशिक्षण