शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

लोभ नडला अन् तो कोठडीत पोहचला

By नरेश डोंगरे | Updated: July 14, 2023 13:46 IST

मौल्यवान ऐवज असलेली बॅग चोरून नेली : सीसीटीव्हीने त्याची चुगली केली

नरेश डोंगरे

नागपूर : विरंगुळा म्हणून तो रेल्वेस्थानकावर आला. फलाट क्रमांक ८ वर सहज फिरत असताना त्याला बाकड्यावर एका बॅग दिसली. त्याच्यात लालसा निर्माण झाली अन् ती बॅग उचलून तो सरळ निघून गेला. दरम्यान, आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरटा त्यात दिसला. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. शेख रज्जाक (वय ४४, रा. लोहरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख २० हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग जप्त केली.

धवल अतकरे असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. त्यांना आझाद हिंद एक्सप्रेसने पुण्याला जायचे होते. ते नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर आले. गाडीच्या प्रतिक्षेत बाकड्यावर बसले. दरम्यान २.३० ते ३ वाजेच्या सुमारास गाडी आली. त्यांनी बॅग तेथेच ठेवली अन् गाडीची खात्री करायला गेले. त्याच वेळी आरोपी शेख रज्जाक तेथे आला. बॅग पाहून त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. बॅग जवळ कोणी नसल्याने त्याने बॅग उचलली आणि निघून गेला.

अतकरे बॅग घेण्यासाठी परतले तेव्हा ती जागेवर नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, बॅग दिसली नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये शेख रज्जाक बॅग उचलून नेताना दिसला. पोलिसांनी शेख रज्जाकची माहिती गोळा केली. तो संत्रा मार्केट परिसरात पुन्हा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी त्याला गुरुवारी पकडले.

म्हणून बॅग उचलून नेली

शेख रज्जाक हा चोरी करण्याच्या सवईचा नाही. कुठल्यातरी कारणावरून तनावात असल्याने तो घराबाहेर पडला. रेल्वे स्थानकावर आला. त्याला बॅग दिसली. त्यामुळे त्याच्या मनात चलबिचल निर्माण झाली. बॅगजवळ कुणी नसल्याने लोभापोटी त्याने ती चोरून नेली अन् आता पोलिसांच्या कोठडीत पोहचला. आता पोलिसांना माहिती देताना बॅग बेवारस दिसली म्हणून उचलून नेण्याची मखलाशी तो करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकnagpurनागपूर