दिव्यांगांना अनुदान याेजना मंजुरीपत्र वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:30+5:302021-04-04T04:08:30+5:30
कामठी : वृद्ध, निराधार व दिव्यांगांना अनुदान याेजनेचा लाभ मिळावा म्हणून कामठी तहसील कार्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रकरणे सादर ...

दिव्यांगांना अनुदान याेजना मंजुरीपत्र वितरित
कामठी : वृद्ध, निराधार व दिव्यांगांना अनुदान याेजनेचा लाभ मिळावा म्हणून कामठी तहसील कार्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रकरणे सादर करण्यात आली हाेती. सादर केलेल्या प्रकरणांना प्रशासनाने नियमानुसार मंजुरी दिली असून, नगरसेविका संध्या रायबाेले यांनी लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरित केले.
या याेजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्र. १५ शिवनगर, रामगड येथील दयावती हेमराज लांजेवार, आनंदनगर येथील सुमन लखन यादव, रामगड येथील सारिका महेंद्र चिमनकर, साईत्रा जाेशी जगणे तसेच आनंदनगरातील सुशीला सुनील हजारे, प्रफुल गणेश उके या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजप शहर महामंत्री उज्ज्वल रायबाेले, विक्की बाेंबले, अजित साेनकुसरे, सेवाराम टंडन, अरुण पाैनीकर, बादल कठाणे, दिनेश खेडकर, पंकज गजभिये, प्रज्वल साेलंकी, जागेश्वर गाेंडाणे, वीरेंद्र राऊत, हरिवंश मिश्रा, अभिषेक कनाेजे, संजय पटले, मुकेश मालाधारी, भारती कनाेजे, सविता टेकाम, प्रतिभा मेश्राम, अलका गाेंडाणे, जयमनी साेनानी, आदी उपस्थित हाेते. शासनाच्या विविध अनुदान याेजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका संध्या रायबाेले यांनी नागरिकांना केले.