शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Gram Panchayat Elections : जि. प. अध्यक्षा कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेस मैदान मारणार का?

By जितेंद्र ढवळे | Updated: November 11, 2022 18:07 IST

पिपळा डाकबंगल्यातील मतदार कुणासोबत : परिवर्तन की विकासाला मत?

नागपूर : ग्रामपंचायत सदस्य ते जि. प. अध्यक्षा असा टप्पा गाठणाऱ्या जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे यांच्या पिपळा (डाकबंगला) येथे ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोकुड्डे यांच्या गावात काँग्रेसचा गट सत्ता कायम राखणार की परिवर्तन होणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

११ सदस्यीय पिपळा डाकबंगला ग्रामपंचायतमध्ये २०१७ च्या निवडणुकीत सरपंचासह काँग्रेस गटाचे ८ सदस्य विजयी झाले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या कल्पना गुणवंत तलमले यांनी १०८४ मते मिळवत अपक्ष उमेदवार पपिता संदीप तलमले यांचा पराभव केला होता. पपिता यांना ६५६ मते मिळाली होती. याशिवाय भाजप गटाच्या रेणुका मोरेश्वर सावरकर यांना ५४८ तर भाजपा बंडखोर योगीता ईश्वर वाठ यांना २१३ मते मिळाली होती.  दहा महिन्यांपूर्वी झालेल्या जि. प.च्या पोटनिवडणुकीत मुक्ता कोकुड्डे यांच्या बडेगाव सर्कलमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. मुक्ता यांचे पती विष्णू कोकुड्डे आणि गुणवंत तलमले हे माजी मंत्री आ. सुनील केदार यांचे कट्टर समर्थक आहेत. 

कोकुड्डेच्या जागी धुर्वे 

ग्रा. पं.च्या पोटनिवडणुकीत कोकुड्डे यांच्या रिक्त जागेवर दीपाली धुर्वे यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय कोविडमुळे मृत्यू झालेले वाॅर्ड क्रमांक ३ चे  सदस्य गणपत सातपुते यांच्या रिक्त जागेवर अपक्ष संदीप तलमले यांचा २७८ मतांनी विजय झाला. त्यामुळे ११ सदस्यीय ग्रामपंचायतीत काँग्रेस गटाची सदस्य संख्या ७, भाजपा गटाचे दोन तर दोन अपक्ष सदस्य झाले. यावेळी सरपंचपद हे अनुसूचित जाती वर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी नवा चेहरा काँग्रेसला द्यावा लागणार आहे. याशिवाय गत पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या आधार पिपळ्याचे मतदार यावेळी  काँग्रेस आणि जि. प. अध्यक्षा मुक्ता कोकुड्डे यांच्यावर किती विश्वास दाखवितात, ते २० डिसेंबर रोजी स्पष्ट होईल.

भाजपापुढे आव्हान 

पिपळा डाकबंगला सावनेर तालुक्यातील महत्त्वाची ग्रा. पं. आहे. यावेळी भाजपाने ग्रा. पं. निवडणुकावर अधिक फोकस केला आहे. मात्र, पिपळ्यात मैदान मारण्यासाठी भाजपाला गावातील जातीय समीकरण लक्षात घेत पॅनल निश्चित करावे लागेल. याशिवाय विकासकामांचा पाढा वाचत यावेळी मैदान मारण्यासाठी काँग्रेसला गावातील असंतुष्टांनाही सामावून घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूर