पदवीधरची मतमोजणी सुरू, उत्सुकता शिगेला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:05+5:302020-12-04T04:24:05+5:30
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात सुरुवात झाली ...

पदवीधरची मतमोजणी सुरू, उत्सुकता शिगेला ()
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात सुरुवात झाली असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निवडणूक निरीक्षक एस.व्ही.आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित आहेत.
पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६४.३८ इतकी आहे.
मतमोजणी चार कक्षात २८ टेबलवर होत आहे. २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या आहेत. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात आली आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.
टपाल पत्रिकेनंतर मतपेटीद्वारे झालेले मतदान एकत्रित करून सर्व मतपत्रिका एका हौदात एकत्रित करण्यात आल्या असून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
बॉक्स
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन
मतमाेजणीदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या उपायोजनांचे काटेकोर पालन करण्यात आले. प्रत्येक टेबलवर सॅनिटायझर, कर्मचाऱ्यांना मास्क व हातमोजे ठेवण्यात आले. तसेच सुरक्षित अंतर ठेवून मतमोजणी केली जात आहे.