पदवीधरांना भूलथापा नको, आता बदल हवा आहे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:49+5:302020-11-28T04:10:49+5:30
नागपूर : पदवीधर मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, एवढ्या वर्षात पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट रोजगार, ...

पदवीधरांना भूलथापा नको, आता बदल हवा आहे ()
नागपूर : पदवीधर मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, एवढ्या वर्षात पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे पदवीधरांना आता भूलथापा नको तर बदल हवा आहे, असे मत ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीरिपा (कवाडे गट), आरपीआय (गवई गट) आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्यासाठी नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्रसन्न तिडके, हरीश भाकरू, मोहन वासनिक, पांडे आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदवीधरांच्या समस्या सोडवून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणे, प्रत्येक क्षेत्रातील पदवीधराला उज्ज्वल भविष्य देणे, कौशल्य विकासासोबत त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा आता एकच ध्यास आहे. शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर पदवीधर मतदार संघातही परिवर्तनाची नितांत गरज आहे आणि हे परिवर्तन घडवून आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे, असे ॲड. अभिजीत वंजारी म्हणाले.
चौकट...
काँग्रेसचा ग्राफ वाढतोय : आ. विकास ठाकरे
काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेतली. नागपूर शहरात मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहता काँग्रेसची मते वाढत गेल्याचे दिसते. यावेळीही वंजारी यांच्यामागे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने उभा असून शहरात काँग्रेसचा ग्राफ वाढलेला दिसेल, असा विश्वास आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.