शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

गोविंदा रे गोपाळा... थरार अन् सळसळता उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:46 AM

गोविंदा रे गोपाळा... म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथके, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईचा सळसळता उत्साह, उंचावरील खुणावणारी दहीहंडी,ङ्घएकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले शथीर्चे प्रयत्न अन् श्वास रोखून हा थरार अनुभवणारे दर्शक अशा उत्साही वातावरणात सोमवारी दहिहंडीचा उत्सव नागपूरच्या सराफा ओळ, इतवारी परिसरात रंगला.

ठळक मुद्देदहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा चढाओढ : प्रेक्षकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोविंदा रे गोपाळा... म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथके, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईचा सळसळता उत्साह, उंचावरील खुणावणारी दहीहंडी,ङ्घएकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले शथीर्चे प्रयत्न अन् श्वास रोखून हा थरार अनुभवणारे दर्शक अशा उत्साही वातावरणात सोमवारी दहिहंडीचा उत्सव नागपूरच्या सराफा ओळ, इतवारी परिसरात रंगला.श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून इतवारा नवयुवक मंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवांसह उपस्थित राहून दहीहंडीचा उत्साह पाहिला. त्यांनी उपस्थित नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत गोविंदा पथकांनाही प्रोत्साहन दिले. याप्रसंगी शहर पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुनील केदार, गिरीश व्यास, अ‍ॅड. अभिजित वंजारी, नगरसेविका आभा पांडे, संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.इतवारी परिसरात दुपारपासूनच उत्साही वातावरण पसरले होते. मच गया शोर सारी नगरी रे.., गोविंदा आला रे आला..,ढाकुमाकूम..ढाकुमाकूम... सारख्या हिंदी -मराठी गाण्यांवर नाचणारे गोविंदा लाल, पिवळ्या, काळया, पोपटी रंगाचे टी शर्ट घालून कपाळाला गोविंदांची पट्टी बांधून दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाले होते. मंडळातर्फे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी स्पर्धा ठेवली होती. आकर्षक बक्षीस मिळविण्यासाठी गोविंदांची तयारी चालली होती. सुरुवातीला महिलांची स्पर्धा घेण्यात आली. त्यांच्यासाठी २५ फुटावर मटकी ठेवण्यात आली. विधीवत पूजन करून हा थरार सुरू झाला. यामध्ये कमीन्स इंजिनीअरिंग कॉलेज आॅफ वुमन्स, हिंगणा व राधाकृष्ण महिला मंडळ, सोनेगाव अशी दोन पथके सहभागी झाली. सळसळता उत्साह, सोबत खिळाडूवृत्ती आणि संगीताचा अशा वातावरणात दहीहंडीपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. आवाक्याबाहेर वाटणाºया दहीहंडीला सलाम ठोकत हे गोविंदा कधी घसरत होते तर कधी शिस्तबद्धपणे थरानुसार उतरत होते. दहीहंडी फोडण्याचा अपयशी ठरलेल्या प्रयत्नानंतरही उपस्थितांमधून झालेला जल्लोष गोविंदा पथकाचे मनोबल उंचावणारा ठरत होता. आणि मग पुन्हा तोच प्रयत्न. त्या उंचापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याने दहीहंडीची उंची कमी करण्यात आली. यानंती कमीन्सच्या पथकाला संधी मिळाली, मात्र ते अपयशी झाले. शेवटी सोनेगावच्या पथकाने संयमितपणे थरावर थर रचून दहीहंडीपर्यंत मजल मारली आणि विजेत्याचे बक्षिस आपल्या नावे केले. या पथकाला नितीन गडकरी यांच्या हस्ते पारितोषिक दिले गेले.यानंतर पुरुष संघांचाही हाच थरार सुरू झाला. यामध्ये जय मॉ काली क्रीडा मंडळ, आदिशक्ती शितला माता मंदिर, भंडारा, जय शितला माता ग्रुप, भोजापूर, भंडारा, जय भीमेश्वर क्रीडा मंडळ, सोनझरी आणि जय शितला माता नृत्य कला मंडळ या पाच पथकांनी सहभाग घेतला होता. या गोविंदा पथकांचा प्रयत्न हजारो उपस्थितांनी श्वास रोखून अनुभवला. डिजेच्या तालावर नाचताना गोविंदा पथकांचे हंडी फोडण्यासाठी चाललेले शर्थीचे प्रयत्न, गोविंदा आला रे... च्या आरोळ््या, थर सुटल्यानंतरही उत्साही प्रोत्साहन आणि श्वास रोखून पाहत असताना दहीहंडी फोडल्यानंतर झालेला उपस्थितांचा एकच जल्लोष. अशा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पुण्या- मुंबईत होणारा दहीहंडीचा थरारक अनुभव नागपूरकरांनी रात्रीपर्यंत अनुभवला.स्पर्धेचे संयोजक संजय खुळे यांच्या मार्गदर्शनात कुणाल गडेकर, राजू हरडे, महेंद्र पळसापुरे, अभिषेक लुनावत, ज्ञानेश्वर काटोले, नीरज पांड्या, सारंग दाबडे, बाला पळसापुरे, ऋषिकेश खुळे, मंगेश डांगे, पवन हटवार, मनीष भुसारी, संजय देवकर, सचिन पळसापुरे, विवेक मोटघरे आदींचा आयोजनात सहभाग होता.

टॅग्स :Govindaगोविंदाnagpurनागपूर