शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी घेतली विकास कामांची माहिती

By admin | Updated: November 8, 2014 02:48 IST

तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे ...

नागपूर: तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे राजभवनावर विदर्भातील विविध विकास कामांची माहिती घेतली. सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामावर भर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे ४ तारखेला विदर्भ दौऱ्यासाठी नागपूरमध्ये आगमन झाले. ५ तारखेपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. दोन दिवस अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केल्यावर आज राजभवनावर त्यांनी विदर्भातील विविध विकास योजनांच्या १४ मुद्यांवर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून अधिकाऱ्यानी त्यांना ही माहिती दिली. त्यात प्रामुख्याने प्रामुख्याने मिहान, गोसेखुर्द प्रकल्पांसह सिंचन योजना व नागपूर विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.राज्यपालांनी सुरुवातीला मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. जयताळा व शिवणगाव येथील नागरिकांचा भूसंपदानास विरोध असल्याने अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्याकडून यावेळी सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयात प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रश्नही कमी अधिक प्रमाणात मिहानसारखाच आहे. पुनर्वसन आणि भूसंपादनास उशीर होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नागपूर विभागात ७३ प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे. यावर १२३४ कोटीचा अतिरिक्त निधी लागणार आहे. यास मंजुुरी मिळाल्यास ४६ हजार हेक्टरमध्ये सिंचन क्षमता वाढणार असल्याचे सांगण्यात आले. सिंचनाचे अनेक प्रकल्प वन खात्याच्या परवानगीसाठी अडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांना वन संरक्षण अधिनियमातून सूट देण्यात यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.राज्यपालांनी स्वच्छाता मोहिमेचाही आढावा घेतला. त्याच प्रमाणे वन हक्क कायद्याची माहिती घेतली. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रमावर भर देण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, मिहान व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)