शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:31 PM

शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.

गोंदिया - भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षणाची मुळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले यांनी केला आहे.

 शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (22 डिसेंबर) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, आ.कपिल पाटील, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील उपस्थित होते. शिक्षक साहित्य संमेलनच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन खा. पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पटोले म्हणाले, सरकारच्या धोरणाचा फटका केवळ शिक्षकांनाच बसला नसून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुध्दा यात भरडली जात आहे. सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी शाळा उघडून शिक्षणाचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शिक्षकांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार प्रसार करुन जे शिक्षण व्यवस्था संपविण्यास निघाले आहे त्यांनाच संपवून नवीन शैक्षणिक क्रांती निर्माण करण्याचे आवाहन केले.

समाजाला सुशिक्षित आणि जागृत करण्याची क्षमता केवळ शिक्षकांमध्ये असल्याचे पटोले यांनी सांगितले. पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व जाचक धोरणामुळे जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकार कमी पटसंख्येचे कारण देत शाळा बंद करुन शिक्षकांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. शाळा बंद झाल्या तर संस्कारीत पिढी कशी निर्माण होईल त्यामुळे शाळा जीवंत राहू द्या असे मार्मिक मत व्यक्त केले. तर लोककवी अरुण म्हात्रे यांनी शिक्षकांंमधील सृजन आणि साहित्याला वाव मिळावा यासाठीच हे साहित्य संमेलन असल्याचे सांगितले. ग्रंथ दिंडी व शाळेची घंटा वाजवून शिक्षक साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. तर लोकशाही संपुष्टात 

लोकांकडील मोबाईल आणि संगणकातील माहितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दहा खासगी कंपन्याची नियुक्ती केली आहे. सरकारच्या धोरणामुळे संविधानाचे मुळ असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून यामुळे लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे माजी खा. नाना पटोले म्हणाले. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार 

शिक्षक भारतीतर्फे संमेलनादरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम अहिवले, पी.एम.बघेले, प्रकाश पंचभाई, कमल बहेकार, के.डी.धनोले, डी.एम.टेंभरे यांचा स्मृती चिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर उपक्रमशील शाळा म्हणून देवरी शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया बेग यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEducationशिक्षण