आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसाठी शासनाकडे रक्कम नाही? दीड वर्षापासून रोख पुरस्कारांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:29 IST2025-09-12T14:24:55+5:302025-09-12T14:29:49+5:30

Nagpur : १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सुवर्णपदकासाठी प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पण, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप रोख पुरस्कारापासून वंचित आहेत.

Government doesn't have money for international medal winners? Waiting for cash awards for a year and a half | आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसाठी शासनाकडे रक्कम नाही? दीड वर्षापासून रोख पुरस्कारांची प्रतीक्षा

Government doesn't have money for international medal winners? Waiting for cash awards for a year and a half

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. खेळाडूंना २२ कोटी ३१ लाख रुपयांची पारितोषिके वाटण्यात आली. १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सुवर्णपदकासाठी प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

पण, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप रोख पुरस्कारापासून वंचित आहेत, ही आठवण राज्यकर्ते आणि प्रशासनालादेखील झालेली नाही. तिरंदाजीत देशाची पताका उंचाविणारे ओजस प्रवीण देवतळे, आदिती गोपीचंद स्वामी, मधुरा शैलेंद्र धामणगावकर, प्रथमेश भालचंद्र फुगे आणि प्रथमेश समाधान जातकर या ताऱ्यांचा विसर का पहला? सर्वांत प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाला डिसेंबर २०२४ ला दहा मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विजेती बनलेली नागपूरची अनन्या लोकेश नायडू हिची कामगिरीदेखील आठवलेली नाही, अनन्याने नुकतेच आशियाई नेमबाजीत सांघिक कांस्यपदकही जिंकले. २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्व, आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना कोट्यवधीचे पुरस्कार देण्याची तरतूद ७ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयात करण्यात आलेली आहे.

खेळाडूंची प्रगती क्रीडा विभागाला माहिती नसावी का? राज्यातील कानाकोपऱ्यांत जिल्हास्तरावर क्रीडा अधिकारी कार्यालय असताना डोळेझाक केली जाते की अनावधानाने चूक होते, हे कळायला मार्ग नाही. क्रीडा संचालनालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी मैदान गाजविणाऱ्या खेळाडूंची स्वतःहून दखल का घेऊ नये? पुरस्कार रक्कम मिळण्यासाठी अर्ज हीच अट असावी का? अर्ज केल्यानंतरही कार्यालयाचे उंबरठे झिजविण्यात खेळाडू आणि पालकांची किती हेळसांड होते, हे खेळाडूंच्या कामगिरीची दखल न घेणाऱ्यांना कधी समजणार? खेळात 'नंबर वन' अशी बिरुदावली मिरविणाऱ्या क्रीडा खात्याने मैदानात उतरून काम केले तरच खेळाडूंच्या वेदना त्यांना समजतील. कागदावर काम करीत राहिल्यास खेळाडूने कितीही घाम गाळला तरी त्याच्या कामगिरीची पावती देणारे शासकीय हात पुढे येणार नाहीत, अशा वेदनादायी प्रतिक्रिया पुरस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

रोख रकमेच्या प्रतीक्षेत असलेले पदक विजेते :

आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी : सातारा), विश्व चौंपियनशिप बर्लिनः सांधिक व वैयक्तिक सुवर्ण, आशियाई चॅम्पियनशिप बैंकॉक: सांधिक व मिश्र सांधिक सुवर्ण, युथ विश्व चैम्पियनशिप आयर्लंड: कैडेट सांधिक आणि वैयक्तिक सुवर्ण, युथ आशियाई चैंपियनशिप तायपेई : सांधिक सुवर्ण, विश्वचषक स्टेज १ ते ४: चार सांधिक सुवर्ण आणि कांस्य

Web Title: Government doesn't have money for international medal winners? Waiting for cash awards for a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर