नागपुरातील गोरेवाडा जंगलाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:33 IST2019-02-21T00:31:15+5:302019-02-21T00:33:42+5:30

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या युनिट -१ परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. मात्र, त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला.

Gorewada forest in Nagpur cought fire | नागपुरातील गोरेवाडा जंगलाला भीषण आग

नागपुरातील गोरेवाडा जंगलाला भीषण आग

ठळक मुद्दे३० हेक्टर परिसर विळख्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या युनिट -१ परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. मात्र, त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोरेवाडा जंगल परिसरात आग लागल्याचे गोरेवाडा प्रशासनाच्या निदर्शनास आले़ थोड्याच वेळात ही आग ३० हेक्टर परिसरात पसरली़ घटनेची माहिती मिळताच गोरेवाडा प्रशासनाची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचून अवघ्या दीड तासात ब्लोअरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. परंतु, काही वेळाते पुन्हा या ठिकाणी आग लागली. दरम्यान, आग विझविण्यासाठी पाण्याचे तीन बंब बोलावण्यात आले. परंतु, त्याआधीच ही आग ब्लोअर मशीनच्या साहाय्याने विझविण्यात आली़

Web Title: Gorewada forest in Nagpur cought fire