‘दुकान खाली कर, नही तो मर्डर कर दुंगा’ म्हणत धमकी, दुकानदाराकडून उकळले १० लाख
By दयानंद पाईकराव | Updated: November 15, 2023 15:33 IST2023-11-15T15:31:21+5:302023-11-15T15:33:14+5:30
लकडगंज पोलिसांनी केला गुन्हा दाखल

‘दुकान खाली कर, नही तो मर्डर कर दुंगा’ म्हणत धमकी, दुकानदाराकडून उकळले १० लाख
नागपूर : दुकान खाली करून घेण्यासाठी मला सुपारी मिळाली असून ‘तू आज दुकान खाली कर, नही तो तेरा मर्डर कर दुंगा’ असे म्हणून आरोपीने एका व्यक्तीला १० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सनी समुद्रे (वय ३८, रा. कांजी हाऊस चौक, यशोधरानगर) असे धमकी देऊन खंडणी मागणाºया आरोपीचे नाव आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुलसी अपार्टमेंट, टेलिफोन एक्स्चेंज चौक येथे शॉप नं. १४ मध्ये आकाश राजन सपेळकर (वय ३४, रा. रामसुमेर बाबानगर) यांचे ऑफीस आहे. या शॉपचे मालक रविंद्रसिंग मल्होत्रा व त्यांच्या पत्नी आहेत. सपेळकर आणि मल्होत्रा यांचा दुकान खाली करण्यासाठी न्यायालयात वाद सुरु आहे.
दरम्यान सोमवारी १३ नोव्हेंबरला सायंकाळी ७.२५ वाजता सपेळकर यांच्या ऑफीसमध्ये आरोपी सनी समुद्रे आला. त्याने ‘ मै ईस एरीया का गुंडा हू, तु मूझे नही पहचानता, किसी को भी मेरा नाम पुछ लेना’ असे म्हणुन फिर्या दीस ‘दुकान कब खाली कर रहा, मुझे दुकान खाली करवाने के पैसे मिले है, तू आज दुकान खाली कर, नही तो तेरा मर्डर कर दुंगा’ असे म्हणुन चाकु दाखवित जीवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये खंडणी मागितली. या प्रकरणी सपेळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपी सनी विरुद्ध कलम ३८४, ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.