शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चाचेरमध्ये मालगाडी रुळावरून घसरली : प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:45 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चाचेर रेल्वेस्थानकावर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक रेल्वेगाड्यांना नागपूरशिवाय इतवारी, चाचेर, तारसा, खात आदी रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.

ठळक मुद्देहावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चाचेर रेल्वेस्थानकावर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता मालगाडीची एक वॅगन रुळावरून खाली घसरली. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक रेल्वेगाड्यांना नागपूरशिवाय इतवारी, चाचेर, तारसा, खात आदी रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार मालगाडी चाचेर रेल्वेस्थानकाच्या यार्डातून निघून मुख्य मार्गावर पोहोचत असताना वॅगन क्रमांक ६२१९१९ चे एक चाक किलोमीटर क्रमांक १०९९/२१ येथे रुळावरून घसरले. मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे इतर वॅगन रुळावरून घसरल्या नाहीत. त्यापूर्वीच मालगाडी थांबविण्यात आली. या घटनेमुळे हावडा-मुंबई अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले तर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सी. रमणा यांनी इतवारी तसेच विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तोमर आणि इतर अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. या घटनेमुळे नागपुरातून सुटलेली १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेसला चाचेर येथे थांबविण्यात आले. १२८१० हावडा-मुंबई मेलला तारसा आणि हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्स्प्रेसला थांबविण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसला रोखून धरण्यात आले. याशिवाय ६८७१६ इतवारी-डोंगरगड लोकलला इतवारी रेल्वेस्थानकावर तसेच ६८७१५ बालाघाट-इतवारी लोकलला खात रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत अप लाईनवरील वाहतुक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. तर डाऊन लाईनवरील काम सुरुच होते.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात