शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘गोल्डमॅन’ पॉवरलिफ्टर आशिया स्पर्धेला मुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:30 PM

गरिबी किंवा अभावग्रस्ततेचे जगणे इच्छाशक्ती असलेल्यांना यशापासून रोखू शकत नाही. मात्र ही अभावग्रस्त परिस्थिती वेळोवेळी परीक्षा मात्र घेत असते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ सुवर्णपदके प्राप्त केलेल्या सागर श्रावण गुर्वे या पॉवरलिफ्टिंग खेळाडूला अशाच परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे. ही परीक्षा आर्थिक परिस्थितीची आहे. सागरची वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेसतर्फे रशियाच्या चिलियाबिनसेक येथे होणाऱ्या आशिया चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. मात्र आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गात अडसर ठरली असून तो स्पर्धेला मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसागरला हवे आर्थिक पाठबळ : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकली ३३ सुवर्णपदके

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरिबी किंवा अभावग्रस्ततेचे जगणे इच्छाशक्ती असलेल्यांना यशापासून रोखू शकत नाही. मात्र ही अभावग्रस्त परिस्थिती वेळोवेळी परीक्षा मात्र घेत असते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ सुवर्णपदके प्राप्त केलेल्या सागर श्रावण गुर्वे या पॉवरलिफ्टिंग खेळाडूला अशाच परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे. ही परीक्षा आर्थिक परिस्थितीची आहे. सागरची वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेसतर्फे रशियाच्या चिलियाबिनसेक येथे होणाऱ्या आशिया चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. मात्र आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गात अडसर ठरली असून तो स्पर्धेला मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती येथे राहणारा सागर हा अत्यंत होतकरू तरुण. वडील श्रावण गुर्वे यांचे रस्त्याच्या कडेला चिकनचे दुकान आहे. आई गृहिणी आहे व आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सागरला बारावीनंतर पॉवरलिफ्टिंग खेळाविषयी आवड निर्माण झाली. या खेळात यशस्वी होण्यासाठी त्याने कसून मेहनत सुरू केली. यादरम्यान घरच्या परिस्थितीची जाणीव त्याला होती. पदवीच्या अभ्यासासह आईसोबत भाजीपाला विकण्यापासूनचे काम करीत कुटुंबाला हातभार लावला. यावेळी आवडीच्या खेळासाठीही त्याचे परिश्रम सुरूच होते. २०१५ मध्ये तो पहिल्यांदा या खेळाच्या स्पर्धेत उतरला. सुरुवातीला अपयशच त्याच्या हाती आले. तो मात्र खचला नाही की मागे हटला नाही. आपले प्रयत्न त्याने सुरूच ठेवले. इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर झालेल्या प्रत्येकच स्पर्धेत सागरने केवळ आणि केवळ सुवर्णपदकावरच नाव नोंदविले. सातवेळा नागपूर चॅम्पियन, पाचवेळा महाराष्ट्र चॅम्पियन आणि दोनदा तो नॅशनल चॅम्पियन ठरला आहे. २०१७ मध्ये थायलंड येथे आणि मागील वर्षी रशियाच्या मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकाचीच कमाई केली.अतिशय शास्त्रीय व शिस्तीने पॉवरलिफ्टिंगचा सराव करणाऱ्या ‘गोल्डमॅन’ सागरला मात्र आर्थिक परिस्थितीमुळे वेळोवेळी परीक्षा द्यावी लागत आहे. येत्या जुलै महिन्यात रशियात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीही त्याला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विमान प्रवास व इतर खर्च अशी दीड लाखाची गरज आहे. यातील अर्धी रक्कम फेडरेशनतर्फे भरली जात असून, उर्वरित रक्कम सागरला येत्या ५ मेपर्यंत जमा करायची आहे.‘सागर’साठी मदतीची लाट हवी !स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कसून सराव करताना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पॉवरलिफ्टिंगमध्ये यशस्वी होण्याच्या त्याच्या स्वप्नाला अधिक बळ देण्यासाठी समाजाकडून सागरसाठी मदतीची लाट येण्याची गरज आहे.सागरला मदत करण्यासाठी दानदात्यांनी सागर गुर्वे याच्या बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ८७७३१०३१००००२४९ या खात्यावर मदत करावी. बँक शाखेचा आयएफएससी कोड बीकेआयडी०००८७७३ हा आहे. सागरला ८८०६५३९६२५ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क केला जाऊ शकतो.‘पॉवरलिफ्टिंग ऑलिम्पिया’साठीही निवडआगामी नोव्हेंबरमध्ये पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड काँग्रेसतर्फे फिनलॅन्ड येथे पॉवरलिफ्टिंग ऑलिम्पियाचे आयोजन होत आहे. त्यासाठी सागरची निवड झाली आहे. ही निवड नागपूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली.

 

टॅग्स :nagpurनागपूरLokmatलोकमत