शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश काेर्स करण्याची सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब आणि इनफिनिटी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा एक महिन्याचा नि:शुल्क ...

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब आणि इनफिनिटी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा एक महिन्याचा नि:शुल्क क्रॅश काेर्स सुरू करण्यात आला आहे. दि. ५ फेब्रुवारीपासून याचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

यासाठी १० जानेवारीपासून नाेंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रॅश काेर्सबाबत चांगलाच उत्साह असून, आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी करून आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय नागपुरातील ४०पेक्षा अधिक शाळा ही स्पर्धा आयाेजित करीत आहेत, जेणेकरून मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि भविष्यात हाेणाऱ्या स्पर्धा परीक्षेत सहभागी हाेण्यासाठी तयार राहतील. याबाबत इन्फिनिटी कोचिंग क्लासेसचे शुभम बन्सल यांनी सांगितले, गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते या कार्यात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय समजण्यासाठी संघर्ष करताना पाहिले आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. ही बाब नेहमी शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे या क्रॅश काेर्सचा लाभ विद्यार्थ्यांना हाेइल, असा विश्वास बंसल यांनी व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती व नाेंदणीसाठी ७३०४९९९७५२ या माेबाइल क्रमांकावर संपर्क केला जाऊ शकताे.

या सुविधा सुद्धा मिळणार

विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण काेर्ससाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासरूम उपलब्ध करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर विद्यार्थी विशिष्ट चॅप्टरसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गात उपस्थित राहू शकतील. याशिवाय ते स्पर्धेतही सहभागी हाेऊ शकतील.

या शाळांनी दाखविली तयारी

क्रॅश काेर्ससाठी शहरातील सेंटर पाॅइंट स्कूल, बिशप कॉटन स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गोधनी, केंद्रीय विद्यालय अंबाझरी वायुसेना नगर, वंडरलॅंड हाईस्कूल कोराडी, सेंट एमबी हायस्कूल, रानी दुर्गावती चौक, तुली पब्किल स्कूल कोराडी रोड आदी ४०पेक्षा अधिक नावाजलेल्या शाळांनी काेर्स सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.