शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच सोन्याची तस्करी

By admin | Updated: September 13, 2014 02:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी होत असल्याचे एक प्रकरण केंद्रीय उत्पादन...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी होत असल्याचे एक प्रकरण केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने उजेडात आणले आहे. ४ जुलै २०१४ रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने निवृत्त सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बोबडे यांना ३१ लाख ९९ हजार रुपये किमतीच्या सोन्याची वीट आणि बिस्किटासह अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (अ) (ड)अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. जप्त मालाच्या मालकीचा दावा करणारा कोणीही पुढे न आल्याने न्यायालयाने बोबडे यांना तडकाफडकी दोषमुक्त केले होते. पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने केला. त्यांनी ९ सप्टेंबर २०१४ रोजी सीमा शुल्क कायदा १९६२ च्या कलम १०४ अंतर्गत तीन जणांना अटक केली. सोन्याची तस्करी करणे, तस्करीची सुविधा उपलब्ध करून देणे, मदत करणे आणि चालना देणे, असे आरोप या आरोपींविरुद्ध आहेत. आरोपींपैकी एकाने ४ जुलै रोजी एअर अरेबिया विमानाने शारजहा ते नागपूर, अशी सोन्याची तस्करी केली होती. एअरलाईन्समध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही खेप नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर करण्यात आली होती. त्यानंतर ती वाहनतळात आपल्या कारमध्ये प्रतीक्षा करीत असलेले बोबडे यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. त्याच वेळी पाळत ठेवून असलेल्या गुन्हे शाखा पथकाने झडप घेऊन बोबडे यांना मालासह अटक केली होती. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने तपास केला असता या सोन्याच्या या तस्करीसाठी सुविधा पुरवण्यात, मदत करण्यात आणि चालना देण्यात एअरलाईन्सचे दोन कर्मचारी आणि कार्गो सर्व्हिस एजंट सामील असल्याचे आढळून येताच त्यांना या प्रतिबंधक युनिटने अटक केली आणि जामिनावर सोडून दिले. दरम्यान गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सोन्याच्या तस्करीच्या एका म्होरक्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ६ मध्ये शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. (प्रतिनिधी)