नागपुरात सोने ३२ हजारांवर, सराफा बाजारात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:47 AM2018-11-04T01:47:13+5:302018-11-04T01:50:12+5:30

शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक परतावा देणाऱ्या सोन्याला असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

Gold prices surged by Rs. 32,000,full bazar | नागपुरात सोने ३२ हजारांवर, सराफा बाजारात तेजी

नागपुरात सोने ३२ हजारांवर, सराफा बाजारात तेजी

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाळीत बाजारपेठांमध्ये उत्साह : सुकामेव्याला मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक परतावा देणाऱ्या सोन्याला असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
ग्राहकांचा बुकिंगवर भर
दसऱ्यापासून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असून, त्यासाठी सोने खरेदी व बुकिंग सुरू झाले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल, अशी अपेक्षा सराफांनी व्यक्त केली. नागपुरात शनिवारी सोन्याचे दर ३२,६०० रुपये असतानाही दुकानांमध्ये गर्दी होती. याशिवाय दोन ते तीन वर्षांपासून आॅनलाईन सोने खरेदीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतरही पारंपरिक सराफाकडे खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे. लग्नसमारंभात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांना नवा साज देण्याचा ट्रेंड आल्याचे सराफांनी सांगितले. या ट्रेंडमध्ये सोन्याच्या दागिन्यांत खडे, हिरे बसवण्याची मागणी होत आहे. एकूण पाहता यावर्षी सोन्याचे दर वधारूनही सराफा बाजारासाठी दिवाळी ‘अच्छे दिन’ घेऊन आल्याचे चित्र आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मीचे चित्र असलेल्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जास्त मागणी राहील, अशी अपेक्षा राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.
ग्राहकांची बाजारात प्रत्यक्ष खरेदीसाठी गर्दी
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर ठेपली असून बाजारातील लगबगही सुरू झाली आहे. त्यातच नोकरदार वर्गाचे पगार व बोनसही झाल्याने बाजारपेठेत आता खरेदीचा उत्साह जाणवू लागला आहे. आॅनलाईन पोर्टल्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असला तरीही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. यंदा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.


सुकामेव्याला मागणी वाढली
दिवाळीच्या तोंडावर सर्वाधिक मागणी गोडपदार्थांना असते. मात्र, मागील काही वर्षांपासून अनेकांनी बाजारात गोड पदार्थांऐवजी सुकामेव्याकडे कल वाढविला आहे. मिठाईत भेसळ किंवा जास्त काळ टिकत नसल्यामुळे नागपूरकरांची आकर्षक वेष्टनातील सुकामेव्याला जास्त मागणी आहे. सुकामेवा टिकाऊ असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव परवडणारे आहेत. बाजारात सुकामेव्याच्या आकर्षक गिफ्ट बॉक्सची रेलचेल आहे. ३०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत पॅकिंग आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव पाहिल्यास काजू, किसमिस, बदाम, पिस्ता आणि अंजीरचे भाव कमी झाले आहेत. बॉक्स किफायत दरात आहेत. 

Web Title: Gold prices surged by Rs. 32,000,full bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.