सोने १६०० रुपयांनी महागले, तर चांदीत ६०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 5, 2025 20:40 IST2025-05-05T20:40:39+5:302025-05-05T20:40:48+5:30
Gold-Silver Rate: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आला. सोमवारी स्थानिक बाजारात चार सत्रांमध्ये सोन्याचे दर १,६०० रुपयांनी वाढून ९५,४०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीत ६०० रुपयांची वाढ होऊन भाव ९५,१०० रुपयांवर गेले.

सोने १६०० रुपयांनी महागले, तर चांदीत ६०० रुपयांची वाढ
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आला. सोमवारी स्थानिक बाजारात चार सत्रांमध्ये सोन्याचे दर १,६०० रुपयांनी वाढून ९५,४०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीत ६०० रुपयांची वाढ होऊन भाव ९५,१०० रुपयांवर गेले. सोमवारी सोन्याचे दर चांदीपेक्षा ३०० रुपयांनी जास्त होते.
सोन्याचे दर कमी होण्याच्या शक्यतांनी ग्राहकांनी खरेदी थांबविली होती. सोमवारी दर वाढू लागताच काही ग्राहकांनी सराफांकडे धाव घेतली. मे महिन्यात दहा ग्रॅम (२४ कॅरेट) शुद्ध सोन्याचे दर १,८०० रुपयांनी वाढले, तर चांदीचे प्रति किलो दर १०० रुपयांनी उतरले.
दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. पुन्हा दर उतरण्याची ते वाट पाहत आहेत. सोमवारी सोने ३ टक्के जीएसटीसह ९८,२६२ रुपयांवर गेल्यामुळे सामान्य ग्राहक खरेदीपासून दूर गेला आहे. दरवाढीमुळे ग्राहक केवळ गुंतवणूक म्हणून सोन्याचे पाहात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.