नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:58 IST2020-08-25T00:57:44+5:302020-08-25T00:58:57+5:30

सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली.

Gold chain of retired officer in Nagpur snached | नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास

नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास

ठळक मुद्देदोन महिन्यानंतर तक्रार, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली.
शिल्पा सोसायटीतील रहिवासी भास्कर रामभाऊ पाठक हे ११ जूनला सकाळी परिसरात फिरायला निघाले. शिल्पा सोसायटीतील बौद्ध विहार जवळ दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. या सोनसाखळीची किंमत ४० हजार रुपये असल्याचे समजते. विशेष म्हणजे, त्यावेळी पाठक यांनी तक्रार देण्याचे टाळले. २३ऑगस्टला त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

दडपणात होते पाठक
सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेमुळे पाठक प्रचंड तणावात आले. घटनेनंतर ते पुण्यात राहणाºया मुलाकडे निघून गेले. काही दिवसांपूर्वीच ते नागपुरात परत आले. तेव्हा त्यांना बेलतरोडी पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याला पकडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांची सोनसाखळी हिसकावून नेणारा आरोपी तोच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

Web Title: Gold chain of retired officer in Nagpur snached