शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आठवड्यात दरवाढ : सोने १,४०० तर चांदीत १,८०० रुपयांची चकाकले !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 3, 2024 20:26 IST

सोने ६३,९०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर

नागपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध घडामोडींमुळे यावर्षी सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला. शनिवार, २ मार्च रोजी नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोने ६३,९०० रुपये आणि प्रति किलो चांदीचे दर ७१,६०० रुपयांवर पोहोचले. आठवड्यातील चढउतारामुळे सोने १,४०० रुपये आणि चांदीत तब्बल १,८०० रुपयांची वाढ झाली. यंदा सोने ७० हजार रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, किमतीतील अस्थिरतेमुळे विक्रीवर परिणाम झालेला नाही.गेल्यावर्षी १६ टक्के परतावा

भारतातील गुंतवणुकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढले आहे. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून लोक वापरासाठीही खरेदी करतात. त्यामुळे मुख्य प्रवाहात सोन्याची मागणी आहे. सोन्याचे मूल्य कमी झाल्याचे कधीही दिसत नाही. गतवर्षात सोन्याने १६ टक्के परतावा दिला. सोने-चांदी या मौल्यवान धातूंवर ३ टक्के जीएसटी आणि दागिन्यांवर १२ ते २० टक्क्यांपर्यंत मेकिंग शुल्क आकारण्यात येते. या दोन्ही कारणांमुळे खरेदीवेळी सोने-चांदीच्या मूळ किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.

अशी झाली चढउतारशनिवार, २४ फेब्रुवारीला सोने ६२,६०० आणि चांदीचे ७०,९०० रुपये भाव होते. सोमवार, २६ मार्चला खुलत्या बाजारात सोने स्थिर तर चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण झाली. मंगळवारी सोने पुन्हा स्थिर तर चांदीत ८०० रुपयांची घसरण होऊन भाव ६९,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, बुधवार, २८ रोजी सोने १०० रुपयांनी कमी झाले तर चांदीत ६०० रुपयांची वाढ झाली. गुरुवार, २९ फेब्रुवारीला सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सोने ६२,९०० रुपयांवर स्थिर, तर चांदीत ३०० रुपयांची वाढ होऊन भाव ७१,२०० रुपयांवर पोहोचले. १ मार्चला सकाळ आणि दुपारच्या सत्रात सोने ६२,९०० रुपयांवर स्थिर होते. तर सायंकाळच्या सत्रात अचानक ३०० रुपयांची वाढ होऊन भाव ६३ हजारांपुढे ६३,२०० रुपयांवर गेले. मात्र, चांदीचे दर ७०,७०० रुपयांपर्यंत कमी झाले. शनिवार, २ मार्चला बाजार बंद होताना सोने ७०० रुपयांनी वाढून ६३,९०० आणि चांदीचे भाव ९०० रुपयांची वाढून ७१,६०० रुपयांवर पोहोचले. आठवड्यातील घडामोडीनुसार सोने १,४०० आणि चांदीत १,८०० रुपयांची वाढ झाली.

सोने-चांदीच्या दरवाढीचा तक्ता :दिनांक सोने चांदी२४ फेब्रु. ६२,६०० ७०,९००२६ फेब्रु. ६२,६०० ७०,६००२७ फेब्रु. ६२,६०० ६९,८००२८ फेब्रु. ६२,५०० ७०,४००२९ फेब्रु. ६२,९०० ७१,२००१ मार्च ६३,२०० ७०,७००२ मार्च ६३,९०० ७१,६००(दरावर ३ टक्के जीएसटी वेगळा)

टॅग्स :GoldसोनंSilverचांदीnagpurनागपूर