पुण्याला जाणे पडले महागात, सहकारनगरात ६.९७ लाखांची घरफोडी
By योगेश पांडे | Updated: March 22, 2023 14:42 IST2023-03-22T14:41:32+5:302023-03-22T14:42:52+5:30
सोनेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद

पुण्याला जाणे पडले महागात, सहकारनगरात ६.९७ लाखांची घरफोडी
नागपूर : सर्व कुटुंबिय पुण्याला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घरफोडी करत एका घरातील ६.९७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकारनगरात ही घरफोडी झाली.
भाग्यश्री अजय पोहणकर या आपल्या घराच्या दाराला कुलूप लावून कुटुंबियांसह १४ मार्च रोजी पुण्याला गेल्या. २१ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त त्या परत आल्या असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. अज्ञात चोरट्याने स्वयंपाकघराच्या ग्रील तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोख २.६० लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने, डायमंड रिंग असा ६.९७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
विशेष म्हणजे चोरट्यांनी डीव्हीआर व त्याचा बॅकअपदेखील चोरून नेला. पोहणकर यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहकारनगर व आजुबाजूच्या परिसरात पोलिसांची गस्त कमी झाली आहे. याचाच फायदा चोरटे उचलत असल्याची नाराजी नागरिकांनी बोलून दाखविली.