शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नागपुरातील धोकादायक खड्ड्यांच्या तक्रारीसाठी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर अकाऊंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 9:12 PM

धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व ट्विटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कारवाई : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघात व वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व ट्विटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.शहरामध्ये रोडवरील धोकादायक खड्ड्यांमुळे गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर, २९ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाले. रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च फौजदारी याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन इतर मुद्दे विचारात घेण्यासाठी याचिकेवर बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली. शहरात एकूण २२०१.१९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या २९.८०, राज्य महामार्ग प्राधिकरणच्या ६.७० तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८४.४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर सुधार प्रन्यासकडील सात योजना व गुंठेवारी क्षेत्रात काही रस्ते आहेत. यापैकी अनेक रस्त्यांवर धोकादायक खड्डे आहेत. या प्रकरणात अ‍ॅड. राहिल मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, मनपातर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध एफआयआरनागरिकांनी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप व ट्विटर अकाऊंटवर तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारी योग्य कारवाईसाठी तत्काळ मनपाच्या संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जातील. त्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यामध्ये भादंविच्या कलम २१७ व २८३ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला सांगितले.मनपा आयुक्तांना तंबीही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी महापालिका आयुक्त काय कारवाई करणार आहे त्याची माहिती बुधवारी प्रतिज्ञापत्रावर सादर करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास मनपा आयुक्तांनी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरPoliceपोलिस