शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या

By आनंद डेकाटे | Updated: April 29, 2024 17:39 IST

महासंचालक नंदकुमार : नागपूर विभागाची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) नागपूर विभागात बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी सोमवारी संबंधित विभागांच्या यंत्रणांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृद्धीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजित घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लाख हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गरिबी निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना नंदकुमार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजित घोरपडे यांनी माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलGovernmentसरकारBambu Gardenबांबू गार्डन